देवरुख : प्रतिनिधी संगमेश्वर येथील कोळंबे सोनगिरी ग्रामपंचायत मध्ये समोर आला आहे.गैर व्यवहार प्रकरणी चौकशी करिता उपस्थित असलेले गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी श्री.गिरी व श्री.घुळे ग्रामस्थांच्या व्यथा न ऐकताच व कोणताही ठराव नसताना सरपंच उपसरपंच ग्रामसेविका संगनमताने गैर व्यवहार करीत होते असे आरोप करण्यात आले आहेत. त्याबाबत प्रसिद्धी झाली असून त्यांना अधिकारी पाठीशी घालून कोणतीही कार्यवाही न करता व ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता ग्राम सभेतून मधूनच उठून निघून गेले.याची व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाली आहे.समन्वय युवा सामाजिक संघटना,ग्रामस्थ व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य संगमेश्वरच्या वतीने कामात हलगर्जीपणा, अधिकाराचा गैरवापर, व कर्तव्यात कसूर केल्या बद्दल कामावरून बडतर्फ करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे
पंचायत समिती देवरूख मध्ये अनेक तक्रारी येत आहेत यामध्ये प्रामुख्याने काही ग्रामसेवक, काही ग्रामपंचायत,काही ग्रामपंचायती मधील जल-जीवन मिशन,ग्रामपंचायतीची विकास कामांबाबत चौकशी, ग्रामसेवक मुख्यालयात गैरहजर राहणे, ग्रामस्थांना ग्रामसभा ठरावात विश्वासात न घेता परस्पर गैव्यवहार करणे ठरावात रस्त्यां बाबस्त तक्रार अर्ज ग्रामपंचायत मध्ये सी सी टिव्ही व बायो मॅट्रिक यंत्रणा बसविणे साठी आदेश असताना त्याची अंमलबजावणी न करणे,ग्रामसेवक, सरपंच यांच्या चौकशी बाबत आदेश असताना त्यांची चौकशी न करता अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणं.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागविण्यात आलेली माहिती पुरवण्यात न पुरवता अर्जदाराला अधिकारी वर्गाचा धाक दाखवून ग्रामस्थांच्या अर्जाला केराची टोपली दाखविणे.असे अनेक प्रकार गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातुन खुलेआम होत आहेत अश्या अनेक तक्रारी जोर धरू लागल्या आहेत असे असताना.
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही अद्याप भ्रष्ट अधिकाऱ्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.अशा अनेक विषयाबाबत माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे संगमेश्वर तालुक्याचे वतीने सन्मा.मुख्यमंत्री महोदय, सन्मा. जिल्हाधिकारी, सन्मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते व महा संघाचे संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष मनोहर गुरव,प्रचार प्रमुख एकनाथ मोहिते,सक्रिय कार्यकर्ते सतीश कीर्वे सह संघटक अनिल सागवेकर व अन्य पदाधिकारी यांनी सांगितले.
जाहिरात