जनशक्तीचा दबाव न्यूज | दापोली | जानेवारी ३१, २०२३.
नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग आहे म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष म्हटले जाते. मात्र ही संकल्पना कालबाह्य होत चालली आहे. शहाळी आणि नारळ विक्री या पलिकडे या पिकाचा वापर होताना दिसत नाही. हे सर्व लक्षात घेवून कल्पवृक्ष केंद्राचे आयोजन केलेले आहे, असे प्रतिपादन त्रिवेणी पवार हिने केले आहे.
विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता आणि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोली येथील कृषी महाविद्यालयात सातव्या सत्रातील कृषी जागृती आणि कृषीप्रणाली या दोन गटांनी नुकतेच कल्पवृक्ष माहिती केंद्राचे आयोजन दापोली तालुक्यातील कुडावळे येथे केले.