
विरार(दिपक मांडवकर/शांताराम गु गुडेकर ) रेल्वे प्रवासी प्रगती मित्र मंडळतर्फे शनिवार(दि.१२ऑगस्ट २०२३) रोजी प. भाऊसाहेब वर्तक हॉल विरार येथे अनाथ, अंध,अपंग आणि कर्णबधीर बालकांना विविध घटकातील मदतीकरीता कोकणातील जाकडी नृत्य सादर केले होते.कोकणची लोककला शक्ती -तुरा सामना सादर करून या माध्यमातून दर वर्षी विविध गरजू मुलांना सहकार्य केले जाते. यावर्षी देखील रशिकप्रेक्षकानी हॉल तुडुंब भरला होता.पुन्हा एकदा हा कार्यक्रम हाऊसफुल करण्यात आयोजक यशस्वी झाले.प्रेक्षकांच्या साहाय्याने मिळालेला निधी गावातील व मुंबई, पुणे येथील गरजू मुलांना आयोजकतर्फे सुपूर्द करण्यात आला.




या कार्यक्रमाची सुरवात मा.अध्यक्ष श्री.मनोहर गोताड यांच्या हस्ते रंग देवतेला श्रीफळ अर्पण करून केली.दीपप्रज्वलित साठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र पोलीस प्रकाश ननावरे उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलित करण्यात आले.श्री गणेश पूजन वरिष्ठ वकील दिनेश शिंदे,कृष्ण शिगवण व सुरेश यादव,मंगेश गोरीवले,प्रणय नाडकर, यांनी केले.तर नवतरुण मंडळींनी रंगदेवतेला पुष्पहार अर्पण केला.शिस्तबद्द नियोजनाने सर्व मान्यवरांची मने जिंकली.शक्तिवाले शाहीर सौ.तेजल पवार आणि तुरेवाले शाहीर श्री.रत्नाकर महाकाळ यांनी आपल्या कला सादर करताना रसिकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमात देणगीदार व अनाथांचे नाथ म्हणून साठ मान्यवर उपस्थित होते.


यात विधी ज्वेलर्सचे मालक परशुराम पारावे,महाराष्ट्र पोलीस प्रकाश ननावरे,पशु संवर्धन सभापती बबन मनवे,उच्च न्यायालय कर्मचारी समाजसेवक चंद्रकांत करंबेळे,महाराष्ट्र सुपर फास्ट न्युज संपादक जितेंद्र शिंदे,शिवसेना विभाग प्रमुख निलेश तेलंगे, समाज सेवक सुनील भावेन, किशोरजी भेरे, संभाजी मालप, झुंजार प्रोड्यक्शन कृष्णा येद्रे, रुगणसेवक साईनाथ वेलनगीकर, देवेंद्र गोठल सह साठ मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले. शाहिर सौ. तेजल पवार व शाहिर रत्नाकर महाकाळ यांना ही सन्मानित करण्यात आले.तर याच क्षणी मंडळाचे मदतीचा उद्देश म्हणून सोळा विविध घटकांतील मुलांना मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली.या कार्यक्रमाची जबाबदारी सर्व सदस्यांनी स्वीकारून कार्यक्रम हाऊफुल करण्यासाठी नवतरुणानी पूर्ण जबाबदारी घेताना सुरेंद्र कुडेकर याने सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिली.त्यांचे मंडळाच्या वतीने कौतुक करण्यात आले.


प्रगती मित्र मंडळ म्हणजे रोजची शिदोरी आणि जिंदगीची झोळी पाठीला लावून मुंबई लोकल ट्रेन मध्ये जीवघेणा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची नाळ जनसेवेसोबत जोडली गेली आणि प्रेरणास्थान कै. किसन काका दुर्गोवले यांच्या संकल्पने १ जानेवारी २००७ रोजी प्रगती मित्रमंडळाच्या स्थापना झाली. ज्या लोकल मध्ये, पत्ते, झुगार, दादागिती, थट्टा मस्करी, आणि रोजच्या पार्ट्या होतात त्याच रेल्वेच्या चर्चगेट विरार लोकल मध्ये सायंकाळी ६. ५० मिनिटाच्या एका डब्यात हे जनसेवेचे रोपटे लावले गेले आणि मंडळाचे अनाथांचे नाथ अध्यक्ष श्री. मनोहरजी गोताड, गरिबांचे दैवत मंडळाचे सचिव श्री परशुराम वाघरे आणि यांच्या नेतृत्वाखाली ५० सदस्यांच्या शिरावर असलेले सर्व जाती धर्माच्या सदस्यांनी सोळा वर्षे हा मंडळाचा जनसेवाचा रथ चालवत असताना २०१० पासून स्वतःच्या खिशाला कात्री लावून आज पर्यंत नव्वद गरजू मुलांना विविध मदत केली गेली.

यात काहींना गणवेश, काहींची शाळेची फी, काहींना व्हिलचेर, कोणाला कानाची मशीन, तर अनाथांना मदतीचा हात देण्यात आला व कार्यक्रमाच्या सुरवातीला सूत्रसंचालन करताना ऍडवकेट श्री. दिनेश शिंदे म्हणाले की, मायबाप रसीकप्रेक्षक आपण प्रेक्षक म्हणून या ठिकाणी आलात आणि २००/- रुपयांचे तिकीट घेऊन आपले मनोरंजन झाले पण ते पैसे कोठेच वाया गेले नाही तेच पैसे अश्या मुलांना मदती साठी उपयोगी आले जे जीवनाशी संघर्ष करत आहेत.. वर्षातून एकदा हे मंडळ असे कार्यक्रम राभवत असतात त्या वेळी नक्कीच प्रेक्षक नव्हे तर देवदूत म्हणून याना सहकार्य करण्या साठी वर्षोनुवर्षे साथ द्या… आपल्या मनोरंजनातून अनाथ मुलांच्या संगोपना साठी मदतीचा हात द्या. हे प्रगती मित्र मंडळ आपले सर्वांचे समजून रंजल्या गांजल्यांची साथ द्या असे संबोधित करून कार्यक्रम संपन्न झाला.