
भाजपा युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी बैठक.!
मुंबई; मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीच्या संबंधित, महाविजय २०२४, घर चलो अभियान, हर घर तिरंगा, राष्ट्रीय स्तरावरून आलेले कार्यक्रम महाराष्ट्रात राबवण्याच्या विषयात संवाद तसेच राज्यातील युवा वर्गाला विविध क्षेत्रात येणाऱ्या प्रश्नांना घेऊन चर्चा झाली.
यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. राहुल जी लोणीकर तसेच प्रदेश सरचिटणीस अनुपजी मोरे, शिवानी ताई दाणी, बादल जी कुलकर्णी, योगेश मैंद, निखिल चव्हाण, सुदर्शन पाटसकर यांच्यासह इतर प्रदेश पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहिले.
