९ ऑगस्ट/नवी दिल्ली-भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 81 हजार 938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10 हजार 570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत नोंदणी झालेल्यांची ही माहिती आहे. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत खासदार प्रीतम मुंढे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. काही राज्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची अजिबात कमतरता नसल्याचे रुपाला म्हणाले. यावेळी रुपाला यांनी देशभरातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची राज्यनिहाय आकडेवारी सांगितली.
पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सर्वात जास्त नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. राज्यात 10 हजार 570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश 6 हजार 907, तामिळनाडूमध्ये 6 हजार 245 आंध्र प्रदेशात 5 हजार 324, केरळमध्ये 5 हजार 172, कर्नाटकमध्ये 4 हजार 786, गुजरातमध्ये 4 हजार 417 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत.