रत्नागिरी स्थानकावरही शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते होते उपस्थित.
रत्नागिरी : कोकण रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन कार्यक्रम आज मंगळवारी पार पडला. रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे भाजपा-शिवसेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणातील रत्नागिरी सह १२ स्थानकांचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानकांचा कायापालट होण्याची आज सुरुवात होणार आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून चांगल्या योजना करण्याच काम सुरू आहे. रविंद्र चव्हाण यांनी याबाबत प्रकल्प तयार केला. त्यांनी ७ महिन्यात सर्व प्रक्रिया केल्या आहेत. गणपतीच्या आधी बरंच काम पूर्ण करण्याचा मानस आहे. कोकणात विमानतळ, रस्ते, रेल्वे स्थानक विकसीत करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. समुद्र किनारे देखील विकसीत करण्याची योजना आखण्यात आली आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोकणातल्या १२ रेल्वे स्थानकांच्या कामाचा शुभारंभ आज होतोय. कोकणाच्या दृष्टीने हा महत्वाचा उपक्रम आहे.
पंतप्रधान मोदींनीही देशातील ५० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात. कोकणाला व तेथील पर्यटनाला त्याचा फायदा होईल. देश-परदेशातून लोकं कोकणात येतात. मात्र कोकणाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आजचा उपक्रम महत्वाचा आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण १२ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रीटकरण व सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन होणार करण्यात आले. कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरही सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मोठ्या थाटात करण्यात आला यावेळी भाजपा शिवसेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, किरण सामंत, राहुलजी पंडित, शिल्पा सुर्वे, ऐश्वर्याताई जठार, राजू भाटलेकर, दादा ढेकणे, सचिन करमरकर, मुन्ना चवंडे, अशोक वाडेकर, भाई विलणकर, अडिवरेकर, विक्रम जैन, ऋषी केळकर, संपादक तळेकर प्राजक्ता रूमडे, पल्लवी पाटील, सोनाली आंबेकर, नितीन जाधव, मनोज पाटणकर, दादा दळी, भाई जठार, प्रतीक देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.