बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी…

Spread the love

🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | गांधीनगर | जानेवारी ३१, २०२३.
◼️ आपल्या गांधीनगर येथील आश्रमातील शिष्येवर बलात्कार केल्याच्या आरोपात येथील न्यायालयाने अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना दोषी ठरवले आहे. आता दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर उद्या म्हणजे मंगळवारी त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे.

◼️ आसाराम यांचा मुलगा नारायण साई, पत्नी, चार अन्य शिष्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. मात्र सुनावणीच्या वेळी या प्रकरणाशी सर्व तथ्ये तपासून पाहिल्यानंतर आसाराम वगळता अन्य आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. सूरतमध्ये राहणाऱ्या एका तरूणीने याबाबत तक्रार दिली होती. दहा वर्षांपूर्वी जेव्हा आपण आश्रमात गेलो होतो त्यावेळी ही घटना घडली होती. आपल्यावर अनेक वेळा अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तिने केला होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page