Pune; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे. अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला’, असे विधान अमित शाह यांनी केले आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवी उपस्थित होते.
सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ चा शुभारंभ अमित शाहांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी अमित शाह म्हणाले की, ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच पुण्यात आलो आहे आणि पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आहोत. दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला.” अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी नमस्कार करत प्रतिसाद दिला.
पुढे अमित शाह म्हणाले की, “देश एका बाजूला आहे आणि महाराष्ट्र एका बाजूला आहे. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी येथे सर्वांना घेऊन आलो आहे.” या कार्यक्रमात अजित पवार यांनीही अमित शाह यांचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
“अमित शाह हे गुजरातमधून येतात. पण, त्यांचे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे,” असेही अजित पवार म्हणाले.
जाहिरात