संगमेश्वर :- नावडी (गणेश आळी) येथील नवोदित गायिका कु. युगा विनय कोळवणकर( इ.७ वी ) हिने भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या गायनाच्या प्रारंभिक परीक्षेत त प्रथम श्रेणी प्राप्त केल्याने तिचा संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सुरेश ठाकूर गावित यांच्या हस्ते युगा कोळवणकर हिला ‘विश्व समता’ प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच उपनिरीक्षक श्री शंकर नागरगोजे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला . महिला दक्षता कमिटीच्या ज्येष्ठ सदस्य सौ. माधवी मनोहर भिडे यांनीही भेटवस्तू देऊन युगा विनय कोळवणकर हिचे अभिनंदन केले.
यांनी याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. कु. युगा विनय कोळवणकर हिने आपल्या गायन कलेच्या गुरु आदरणीय कु. निहाली अभय गद्रे यांच्या बद्दल आदर व्यक्त केला.