ठाणे;प्रतिनिधी (निलेश घाग) दिवा शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दातिवली शाखेत पक्ष प्रमुख मा.मुख्यमंत्री श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख मा.आमदार मा.श्री सुभाषजी भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ योगिता हेमंत नाईक (महिला उपशहर प्रमुख),श्री गुरुनाथ नाईक,(विभाग प्रमुख)श्री वैष्णव पाटील (युवा सेना)श्री हेमंत प्रल्हाद नाईक(समाजसेवक-दिवा शहर) यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते,त्यावेळी दिवा शहरातील शेकडो नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून आरोग्य शिबिरात तपासणी करून लाभ घेतला.
दिवा शहरातील नागरिकांच्या उस्फूर्त प्रतिसाद लाभल्या बद्दल शिवसेना दातिवली शाखेने नागरिकांचे आभार व्यक्त केले,
आरोग्य शिबिराला शिवसेना(उ.बा. ठाकरे)पक्षाचे प्रवक्ते श्री अनिस गाडवे,कल्याण जिल्हा प्रमुख श्री सदानंद थरवळ, युवानेते श्री सुमितभाई सुभाष भोईर, उपशहर प्रमुख सचिन पाटील,युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर,युवा उप अधिकारी अक्षय म्हात्रे युवा शहर सचिव उमेश राठोड, सोशल मीडिया समन्वय विराज सुर्वे,विभाग प्रमुख चेतन पाटील,मच्छिंद्र लाड,महिला आघाडी सौ प्रियांका सावंत,सौ स्मिता जाधव व वार्ड क्र २८ च्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवल्या बद्दल शिवसेना दातिवळी शाखे तर्फे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक,युवासैनिक,महिला आघाडी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
जाहिरात