
ठाणे :प्रतिनिधी (निलेश घाग) राज्यात येत्या ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. राज्यातील इतर भागातील परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच दहावी आणि बारावीचे उद्या होणारे पुरवणी पेपरही पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने १० वी व १२ वीच्या उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. १० वी चे पुढे ढकलण्यात आलेले पेपर २ ऑगस्ट रोजी होतील तर १२ वीचे पेपर ११ ऑगस्ट रोजी होतील.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मंगळवारी या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
पहा शासन निर्णय

परिस्थिती पाहून निर्णय घ्या, शिक्षण उपसंचालकांचे आदेश
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकक्षेतील परिस्थिती विचारात घेता आपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा तसेच त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.
