
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. एका व्यक्तीच्या हातातून चार महिन्यांचं बाळ वाहत्या नाल्यात पडले. यानंतर नाल्याच्या वाहत्या पाण्यात हे बाळ वाहून गेले. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ते बाळ सापडले असे अगोदर जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. मात्र ते बाळ असून सापडले नसून ती माहिती आहे ती रसायनीमधील जुनी असल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करून रेल्वे प्रवासाच्या हातून पडलेल्या त्या बाळाचा शोध सुरु असल्याचे रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुपारी तीनच्या सुमारास
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान २ तास उभा होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यात एका लहान बाळाला घेऊन त्या बाळाची आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटून नाल्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत बाळ वाहून गेल्याची ही दुर्देवी घटना घडलीय. त्या बाळाचा शोध घेण्यात आला. शोध कार्य सुरु
असून सापडलेले बाळ हे रसायनीमधील जुनी माहिती असल्याचा खुलासा निवासी जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी जनशक्तीचा दबाव प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले