
संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस ;
२४ तासात ११२ मि.मी. पावसाची नोंद
१) गडनदी पुल मौ.आरवली मुंबई -गोवा महामार्ग हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू आहे.
२) माखजन बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाली असून १० दुकानांत पाणी शिरले आहे. अद्याप नुकसान नाही.
३) मंडळ मूरडव,कुंभारखाणी बु.येथे मोरीवर पाणी आलेने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.चिपळुण आगराची बस सावर्डे मार्गे रवाना झाली आहे. माखजन जाणारी बस असुर्डे मार्गाने रवाना झाली आहे.सर्व प्रवासी सुखरूप आहेत.बस चालक संबंधित वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. कुटगिरी पोलिस पाटील स्वतः तेथे उपस्थित आहेत.
४) बावनदी ते देवरुख रस्त्यावर झाडे पडली होती ती काढून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
५) संगमेश्वर तालुक्यात अंशतः घरांचे नुकसान झाले आहे. जीवित हानी नाही.