
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) दिवा शहरामध्ये ४ लाखाहून अधिक लोकवस्ती असून सुद्धा अध्याप टोरेंट पॉवर चे NPC एनपीसी कार्यालय नाही, एखाद्या ग्राहकांची विद्युत वहिनी गेली असता तक्रार तक्रारींचे निवारण करण्याकरिता टोरेंट पॉवर विभाग कडून कोणतीही शहानिशा न करता कोणत्याही प्रकारचे अपेक्षित उत्तर दिले जात नाही असे ग्राहकांचे म्हणणे आहे, ग्राहकांच्या सोयीकरिता काल रात्री भिवंडी चे चेतन बदयांनी साहेब पी.आर.ओ PRO याना दिव्यातील सोनिश माधव यांनी संपर्क केला असता त्यांच्या कडून मिळालेल्या माहीत नुसार दिवा शहराच्या तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे कामकाज मुंब्रा येथून केले जाते. ग्राहकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या करिता दिवा शहर अध्यक्ष श्री. तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ जून २३ रोजी दिवा टोरेंट पॉवर कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते,

विषय: अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी दिवा भागात स्वतंत्र पथक
संदर्भ: दि.०८.०७.२०२३ चे पत्र (आवक क्र. २३-२४/शिल /६६६) POWER वर उल्लेख केल्याप्रमाणे आम्हाला आपले पत्र प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये आपण अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी दिवा भागात स्वतंत्र टीम नियुक्त करण्याबाबत नमूद केले आहे. दि: १४.०७.२०२३ सर्वात प्रथम आम्ही आपण उपस्थित केलेल्या विनंतीचे कौतुक करतो.आम्ही असे कळवू इच्छितो की, आम्ही दिवा परिसरात आमच्या कार्यालयासाठी योग्य जागा शोधण्याच्या प्रक्रियेत आहोत जेणेकरुन आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना या कार्यालयातून काम सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था पुरवू या पत्राद्वारे आम्ही निवेदन करू इच्छितो कि, दिवा परिसरात अनधिकृत व धोकादायक झालेले केबल्स, ट्रान्सफार्मर बदलणे ही कामे सुरू झालेली आहेत. येथील ग्राहकांना अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा मिळावा असा सकारात्मक प्रतिसाद पत्राद्वारे कळविण्यात आला आहे
