मुंबई,१५जुलै: गेल्या वर्षी कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली एशियन क्रीडा स्पर्धा यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमधील ग्वांगझू येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये आपला पुरूष आणि महिलांचा क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
या स्पर्धेसाठी बीसीसीआयने महिला संघाचीही निवड केली आहे. मात्र, याच काळात भारतात वन-डे वर्ल्डकप होणार आहे. यामुळे या स्पर्धेसाठी पुरूषांचा ‘ब’ संघ पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पुरूष ‘ब’ संघाचे नेतृत्व मराठमोळा ऋतुराज गायकवाड करणार आहे. या संघात तिलक वर्मा, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे.
ऋतुराज गायकवाडला प्रथमच टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले आहे. एशियाई स्पर्धेत २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पुरुषांचे टी-२० क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत.