
दिवा : प्रतिनिधी दिवा शहरामध्ये ४ लाखाहून अधिक लोकवस्ती असून सुद्धा अध्याप टोरेंट पॉवर चे NPC एनपीसी कार्यालय नाही, एखाद्या ग्राहकांची विद्युत वहिनी गेली असता तक्रार तक्रारींचे निवारण करण्याकरिता टोरेंट पॉवर विभाग कडून कोणतीही शहानिशा न करता कोणत्याही प्रकारचे अपेक्षित उत्तर दिले जात नाही असे ग्राहकांचे म्हणणे आहे, ग्राहकांच्या सोयीकरिता काल रात्री भिवंडी चे चेतन बदयांनी साहेब पी.आर.ओ PRO याना दिव्यातील सोनिश माधव यांनी संपर्क केला असता त्यांच्या कडून मिळालेल्या माहीत नुसार दिवा शहराच्या तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे कामकाज मुंब्रा येथून केले जाते. ग्राहकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या करिता दिवा शहर अध्यक्ष श्री. तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिवा टोरेंट पॉवर कार्यालयाला निवेदन देण्यात आले . त्यावेळी टोरेंट पॉवर चे भिवंडीचे कार्यकारी अधिकारी श्री.अक्रम साहेब यांनी दिवा मनसे ला आश्वासन दिले की आपली मागणी वरीष्ठ अधिकाऱ्यांन पर्यंत त्वरित पोहचवली जाईल अशी ग्वाही देण्यात आली, यावेळी दिवा मनविसे चे विभाग अध्यक्ष कुशाल पाटील,दिवा मनसे चे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, मनविसे चे उपविभाग अध्यक्ष सोनिश माधव,संदीप घाग,,ज्ञानेश्वर आगवने,रमेश पाटील उपस्थित होते.

जाहिरात
