
दिवा : दिव्यातील कोकण प्रतिष्ठान राजकारण विरहित संघटनेची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत देवदत्त घाडी यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तर उपाध्यक्षपदी गोविंद घाडीगांवकर यांची निवड झाली आहे. स्थापना झाल्यापासून देवदत्त घाडी यांचे सामाजिक बांधिलकी जपत वर्चस्व होते.

दि.०१.०७.२३ रोजी सायंकाळी ८ वाजता कोकण प्रतिष्ठान पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. अध्यक्ष पदासाठी देवदत्त घाडी यांची बिनविरोध पुन्हा एकदा अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली,उपाध्यक्षपदी गोविंद घाडीगांवकर,सचिवपदी लक्ष्मण जाधव,तर उप सचिव:- विजय गोवेकर खजिनदार:- रमेश शिंदे,उपखजिनदार:- योगेश कुळये, कार्याध्यक्ष:- प्रशांत गावडे, हिशोब तपासणी:- सोनीश माधव, सल्लागार:- तुकाराम धुमाळ, सल्लागर:- शशिकांत खसासे सल्लागार:- धर्मेश पाटील निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा द्विशतक झळकावत देवदत्त यशवंत घाडी यांच्याकडेच या कोकण प्रतिष्ठान संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. ऐकूण ११ संख्याबळ सभासद अशी बांधणी करण्यात आली आहे.
ही निवडणूक पार पडत असताना संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे त्या ठिकाणी उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे दिव्यातील एकमेव बिगर राजकीय संघटना म्हणून कोकण प्रतिष्ठान या संघटनेकडे पाहिले जाते, या अनुषंगाने संघटनेचे एक पाऊल कसे पुढे जाईल या करिता निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय पदाधिकारी आणि सदस्यांनी घेतला.
जाहिरात
