
खेड : स्विफ्फ २०२३ फिल्म फेस्टिवल मध्ये खेड रत्नागिरी येथील लेखक दिग्दर्शक कु. प्रशांत मनोहर बारटक्के यांचा “व्हॉइस ” हा लघुपट ३० मे रोजी प्रदर्शनासाठी ऑफिशीयली सिलेक्ट झाला होता. न्यायाधीशांच्या परीक्षणानंतर १० जून रोजी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट हे नामांकन प्राप्त झाले. पुरस्कार सोहळा १८ जून ते २५ जून दरम्यान न्यू जर्सी, अमेरिका येथे संपन्न झाला. १९ जून ते २४ जून रोजी सर्व खंडातील चित्रपटांचे प्रदर्शन मांडण्यात आले. शेवटच्या दिवशी म्हणजे २५ जून रोजी पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले. व्हॉइस लघुपट सर्व टप्पे पार करत सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला असून व्हॉइस ला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या फिल्म चे लेखक व दिग्दर्शक खेड चा सुपुत्र कु. प्रशांत मनोहर बारटक्के यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडतर्फे सत्कार करतांना पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, उपजिल्हाध्यक्ष तथा दापोली नगर पंचायतीचे मा. नगरसेवक सचिन गायकवाड,मनविसे मा.जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी,राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, प्रदिप भोसले,अक्षय जांभुळकर,
जाहिरात
