परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूल मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

Spread the love

चिपळूण ; चिपळूण तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूल मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प .ए. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष आणि स्कूल कमिटी चेअरमन श्री. विजयकुमार ओसवाल व प्रशालेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलाने झाली. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकविणाऱ्या प्राध्यापिका सौ. संगीता जोशी यांनी पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या 2022 – 23 च्या निकालाचा आढावा घेतला.
त्यानंतर १०वी व १२वी मध्ये पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
सत्कार प्राप्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संस्थेचे उपकार्याध्यक्ष व स्कूल कमिटी चेअरमन श्री. विजयकुमार ओसवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे उपकार्याध्यक्ष, प्रशालेचे सर्व पदाधिकारी , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांची सदर कार्यक्रमास उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. संगीता जोशी यांनी केले तर माध्यमिक विभागाच्या हेड सौ . रश्मी पाध्ये यांनी आभार मानले.
अशाप्रकारे हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page