मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवरखडी वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने, ११ वाहनांना धडक ,१० जणांचा मृत्यू

Spread the love


समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच पळासनेर गावाजवळ १६ चाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाला. खडी वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने, ११ वाहनांना धडक दिली तसेच बसस्थानकाला धडकत ट्रेलर एका हाॅटेलवर जाऊन आदळला.अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, २३ जण जखमी झाले आहेत.

पहा सविस्तर

मृतांमध्ये तीन विद्यार्थी व दोन महिलांसह ट्रेलरचालक, सहचालकाचा समावेश आहे. हा अपघात मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर झाला. इंदूरकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरमध्ये ४० टनापेक्षा जास्त खडी भरली होती. पळासनेर गावाजवळील हरियाणा हॉटेलसमोर एक ट्रकचालक टायर बदलत असताना त्यास ट्रेलरने धडक देऊन एका दुचाकी गाडीला उडविले. त्यानंतर एका कारला जबर धडक दिली. त्यापाठोपाठ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकी, स्कूल बस आदी वाहनांना धडक देत बसस्थानक व हॉटेल तुडवत कंटेनर उलटला. कंटेनरमधील असलेली १६ टनांपेक्षा अधिक खडी रस्त्यावर व बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या शाळकरी, लोकांच्या अंगावर पडल्यामुळे ते काही क्षणांतच खडीत दबले गेले.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page