
चिपळूण :- शहरातील खंड उपनगर व उपनगर परिसरात असलेल्या साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शिव नदीतील पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली . त्यामुळे गेले दोन दिवस शहरातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला .पुरात वाहून गेलेली जलवाहिनी नदीपात्रातून बाहेर काढून ती आता रस्त्याच्या समपातळीत बसविण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाल्याने येत्या दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे . मात्र , त्यापूर्वी खेंड व बाजारपेठ उपनगर परिसरात गोवळकोट येथून पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे .