
दिव्यातील समर्थ नगर मोरेश्वर कॉम्प्लेक्स मध्ये पिण्याच्या पाण्याच्या क्षुल्लक कारणावरुन दोन गटांमध्ये जुंपल्याची माहिती समोर आली आहे.

दिवा : राहुल अहिरे दिव्यातील समर्थ नगर मधील सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. सोसायटीचे चालक दिलीप धाडवे, अनिकेत देसाई, सौरभ देसाई, प्रथमेश दळवी, सूचित चौहान यांनी रहिवासी श्री.उत्तम सुथार रा. दिवा मोरेश्वर कॉम्प्लेक्स यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोन गटांमध्ये के.जे. कॉम्प्लेक्स ते मोरेश्वर कॉम्प्लेक्स सोसायटीच्या आवारात तुंबळ हाणामारी होत असल्याचं दिसत आहे.

सोसायटी चालक यांच्याकडून त्याच सोसायटीमध्ये राहत असलेल्या इ विंग मधील उत्तम सुथार यांना मारहाण करण्यात आले यात उत्तम सुथार यांच्या हाताला मार लागला असून आरोपी प्रथमेश दळवी वय वर्षे २४,दिलीप धाडवे वय वर्षे ५८, अनिकेत देसाई वय वर्षे २४, सौरभ देसाई वय वर्षे २३, सूचित चौहान, वय वर्षे २२ यांच्या विरुद्ध भा.द.वि.क ३२३/३२६/१४३/१४७/१४८/१४९ अंतर्गत दिवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पो.नि श्री.शहाजी शेळके अधिक तपास करत आहेत.
जाहिरात
