
शिबिराला जोरदार प्रतिसाद
ठाणे, (प्रतिनिधी) पावसाळ्यामध्ये रुग्णांना रक्ताची चणचण भासू नये यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहर शाखा आणि रोटरी क्लब ऑफ दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला शिवसैनिकांचा आणि नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून शेकडो बाटल्या रक्ताचे संकलन झाले. हे रक्तदान शिबीर शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.शिवसेना दिवा शाखेच्या वतीने कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुभाष भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक

मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, कल्याण ग्रा.सहसंपर्कप्रमुख अरविंद बिरमो उपजिल्हाप्रमुख विजय देसाई,
अथर्व साळवी, अंकिता पाटील, उपशहरप्रमुख सचिन पाटील, प्रियंका सावंत, उपशहर संघटक दिवा शहर सौ.योगिता हेमंत नाईक गुरुनाथ नाईक, मच्छिंद्रनाथ लाड, राजेश अभिषेक ठाकूर, अक्षय म्हात्रे, स्मिता जाधव, विनया कदम आदी उपस्थित होते. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात शाखाप्रमुख अनिकेत सावंत, दादा धाडवे, विराज सुर्वे यांचे मोलाचे योगदान मिळाले.
जाहिरात
