प्रतिनिधी, ठाणे : भारतात शहरीकरण जोरात होत आहे. शहरीकरण नव्या समस्यांना सामोरे जात आहे. महाराष्ट्रातील ठाणे शहरात वाढत्या शहरीकरणाने पुराच्या घटनांत वाढ होणार आहे. देशात मोठ्या शहरांत पुराच्या घटना पाहायला मिळतात. ठाण्यातील वाढत्या शहरीकरणाचा अभ्यास मुंबईतील वीरमाता जीजाबाई प्राद्योगिकी संस्थानच्या वतीने करण्यात आला. ठाण्यातील पूर्व पूर प्रभावित भागात सिडको ब्रीज, वृंदावन सोसायटी, राबोडी, कोळीवाडा, क्रांतीनगर, मजीवाडा आणि चेंदनी कोळीवाडा या भागांचा समावेश होतो.
ठाण्यातील बांधकाम क्षेत्रात २७.५ टक्के वाढ
जर्नल ऑफ इंटेग्रेटेड डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटच्या प्रकाशनातून दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात १९९५ ते २००० मध्ये बांधकाम क्षेत्रात २७.५ टक्के वाढ झाली. यामुळे मोकळा भाग, जंगल, पाण्याचे स्त्रोत आणि मॅग्रोव्हमध्ये क्षेत्र कमी झाले. मोकळ्या जागेत २९.५ टक्के जंगलात ८ टक्के, पाण्याच्या स्त्रोतात १८.९ टक्के आणि मॅग्रोव्ह ३६.३ टक्के कमी झाली.
पुराचा धोका का वाढला?
ठाण्यात पाऊस पडला तर पाणी बाहेर जाण्यासाठी प्रमुख १७ नाले आहेत. यापैकी ८ समुद्राच्या खालच्या भागात आहेत. परंतु, ६ समुद्राच्या उंच भागातील आहेत. तीन नाले हे समुद्राच्या पाणीपातळीवरील आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी पडल्यास ते पाणी रस्त्यावर साचते.
ठाण्यात ९ ठिकाणी पाणी साचून राहत असल्याचे आपत्ती व्यवस्तापन विभागाच्या लक्षात आले आहे. नगर रचना होताना ४.५ मीटर उंचीवर होणे गरजेचे आहे. शिवाय पाणी साठवून ठेवण्यासाठी तलाव, पम्पिंग सिस्टीमचा वापर करावा लागेल.