🌎 जनशक्तीचा दबाव
ठाणे- ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व आशुतोष म्हस्के यांच्यावतीने आयोजित ‘गणांक’ या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मूर्तिकार हे समाजाचे महत्त्वाचे घटक असून त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदर्शनातील चित्रांची पाहणी केली. गणांक श्रमसाधना गौरव पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. देसाई यांनी मागण्यांचे निवेदन दिले
यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, निमंत्रक आशुतोष म्हस्के, श्री. मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई, प्रा. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.