खेड :- कोकण रेल्वे मार्गावरील कोतवली नजीक बैलांना घेऊन रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या एका ७५ वर्षीय शेतकऱ्याला रेल्वेची धडक बसून तो जागीच मृत्यूमुखी पडल्याची घटना १८ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागोजी महादेव तांबट राहणार कोतवली (मधली वाडी) असे त्या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भागोजी तांबट हे बैलांना घेऊन रेल्वे रूळ ओलांडत होते. त्याचवेळी आलेल्या मंगला एक्सप्रेसची जोरदार धडक या शेतकऱ्याला बसली. यातच ते मृत्यूमुखी पडले . याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.