
रत्नागिरी : 20 जून पासून प्रतिवर्षी स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेववृद्धी मासाचा प्रारंभ होत असतो. ठेव वृद्धीमासाचे स्वरूप उत्सवी झाले आहे. पाहता पाहता ठेव वृद्धीमास हा जनतेचा अर्थ महोत्सव झाला आहे. प्रतिवर्षी ठेव वृद्धीमासामध्ये स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवीदार गुंतवणूक करतात. स्वरूपानंद पतसंस्थेच्या विश्वासार्ह प्रतिमेची खूण गाठ ठेव वृद्धीमासामधील जमा होणाऱ्या ठेवीमुळे अधोरेखित होते.
अर्थ महोत्सवा चे स्वरूप
स्वरूपानंद पतसंस्था प्रतिवर्षी 20 जून ते 20 जुलै हा ठेव वृधीमास म्हणून घोषित करत असते. या ठेव वृधी मासामध्ये सर्व दूर संपर्क करून आपले पारंपारिक तसेच नवनवीन गुंतवणूकदार, ठेवीदार संस्थेच्या परिवारात समाविष्ट होत असतात. स्वरूपानंदाचा ठेव वृद्धीमास हा केवळ व्यवहारिक आर्थिक उपचार राहिला नसून पतसंस्थेच्या उत्तम वाटचालीमुळे पतसंस्था व ग्राहक यांच्यामध्ये निर्माण झालेले स्नेहाचे, आपुलकीचे, विश्वासाचे बंध जपणारा वृद्धिंगत करणारा ठेव वृद्धीमास हा खऱ्या अर्थाने अर्थ महोत्सव झाला आहे.
ऋणानुबंध जपणारी पूर्ण परिवाराला आपली वाटणारी पत संस्था
गेली गेली 32 वर्षे स्वरूपानंद पतसंस्थे जवळ अनेक घराणी जोडली गेली आहेत. स्वरूपा नंदाच्या स्थापनेपासून आज जवळजवळ तिसरी पिढी स्वरूपानंद पत संस्थे बरोबर आवर्जून निगडित झाली आहे. स्वरूपानंदाच्या यशाचं हेच खरं गमक आहे.
विशालकाय झालेलं अर्थविश्व
22000 च्या घरात असणारी मुदत ठेव खाती 47 हजार 178 बचत ठेव खाती इतकं विशाल स्वरूप स्वरूपानंद पतसंस्थेने गेल्या 32 वर्षात लोकसंग्रहातून निर्माण केल आहे. विश्वासार्हता प्रामाणिकपणा आर्थिक शिस्त, नवतंत्रज्ञान व उत्तम आर्थिक सेवा हा मंत्र स्वरूपानंद च अर्थविश्व व्यापक बनवत आहे.
बलवान, पारदर्शक अर्थकारण
265 कोटींच्या ठेवी पतसंस्थेमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवल्या असून 134 कोटींच्या ठेवी पतसंस्थेने विविध योग्य बँकांमध्ये गुंतवल्या आहेत. 188 कोटी चे कर्ज वितरण आणि 99.61% इतकी विक्रमी वसुली ही संस्थेची शक्तिस्थान आहेत. सहा कोटी 63 लाखाचा निव्वळ नफा ,36 कोटी 84 लाखाचा दणदणीत स्वनिधी, 27. 55% एवढे भांडवल पर्याप्तते चे प्रमाण. सातत्याने मिळणारा लेखापरीक्षणातील अ वर्ग, 60% च्या वर असणारा सीडी रेशो अशी संस्थेची सुदृढ आर्थिक स्थिती घेऊन 20 तारखेपासून सुरू होणाऱ्या ठेववृद्धी मासा मध्ये अत्यंत आकर्षक अशा ठेव योजना घेऊन आलो आहोत या योजनांमध्ये मोठी गुंतवणूक करून संस्थेच्या सातत्यपूर्ण, प्रगतिशील अर्थकारणाचे लाभार्थी होतानाच पूर्ण आर्थिक सुरक्षितता अनुभवावी यासाठी आपली गुंतवणूक स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांमध्ये करावी असे विनम्र आवाहन संस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
आकर्षक तरीही सुरक्षित ठेव योजना
या ठेववृद्धीमासामध्ये स्वरूपांजली ठेव योजने मध्ये 12 ते 18 महिने मुदतीसाठी सर्वसाधारण ठेवीदाराना 8%जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी 8.25% असा आकर्षक दर राहणार असून. सोहम योजनेमध्ये 19 ते 36 महिन्यासाठी मासिक व्याज योजनेत सव्वा आठ टक्के सर्वसाधारण ग्राहकांसाठी तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी 8.50 % असा आकर्षक व्याजदर राहणार आहे या ठेव योजनांमध्ये आपली अमूल्य गुंतवणूक करून आकर्षक व सुरक्षित परताव्याचे लाभार्थी व्हावे.
गत वर्षीच्या ठेवींना मागे टाकत या वर्षी अधिक मोठं उद्दिष्ट साध्य करू
गतवर्षी 899 ठेवीदारांनी पतसंस्थेच्या 17 ब्रांच ऑफिसच्या माध्यमातून 12 कोटी 21 लाख रुपयांच्या ठेवी एका महिन्यामध्ये संस्थेकडे गुंतवल्या होत्या.या २० जून पासून प्रारंभित होणाऱ्या ठेव वृद्धीमासामध्ये 15 कोटी च्या ठेवी संकलित करण्याचे उद्दिष्ट संस्थेला खुणावत आहे. ठेवीदारांच्या स्वागतासाठी स्वरूपानंद पतसंस्थेच्या 17 ब्रांच सज्ज झाल्या आहेत. स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव
वृद्धी मासामध्ये मोठी गुंतवणूक करून सहकार चक्र अधिक गतिमान करताना, आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळत राहो ही अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी बोलून दाखवली.