ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राचं राजकिय वातावरण आणखी तापवणार, ‘आवाज कुणाचा’ या यूट्यूब शोच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार

Spread the love

मुंबई- राज्यात सत्तांतर होऊन एक वर्ष पूर्ण होत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाला देखील या महिन्यात एक वर्ष पुर्ण होणार आहे. याच दरम्यान गेल्या वर्षभरात राज्य सरकारच्या माध्यमातून रखडलेल्या आणि सर्व सामांन्यांच्या मुद्दांना घेऊन ठाकरेंची शिवसेना’आवाज कुणाचा’ या यूट्यूब शोच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहे.

या शोचा प्रोमो नुकताच SHIVSENAUBT या युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये शिवसेना नेते आदेश बांदेकर दिसत असून सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांना,भूमीपुत्रांच्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचवूयात असं म्हणत आवाज कुणाचा या कार्यक्रमाचा प्रोमो तयार करण्यात आला आहे.

दरम्यान हा कार्यक्रम कधीपासून प्रसारित करण्यात येणार आहे याची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसून लवकरच ही तारीख जाहीर केली जाणार आहे.संबंधित प्रोमो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून आता पर्यत हा प्रोमो २२ हजार जणांनी शेअर केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page