मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. हा निकाल दुपारी २ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण मुलींपैकी ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर ८९.१४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून ९६.०१ मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के लागला आहे. निकालात पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यातून बारावीच्या परीक्षेस १४ लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १४ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांचा दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
विभागवार निकाल
कोकण: 96.01 टक्के, पुणे: 93.34 टक्के, नागपूर: 90.35 टक्के, औरंगाबाद: 91.85 टक्के, मुबई: 88.13 टक्के ,कोल्हापूर: 93.28 टक्के, अमरावती: 92.75 टक्के, नाशिक: 91.66 टक्के ,लातूर: 90.37 टक्के,