राज्यात तीन दिवस मान्सूनपूर्व सरी कोसळणार
८ जूनला राज्यात मोसमी पावसाला सुरुवात होणार

Spread the love

मुंबई : राज्यात पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ८ जूनला राज्यात मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना मशागतीची कामे वेळेत उरकून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. येत्या सोमवारपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून, जून महिन्याच्या १, २, ३ तारखेलाही पाऊस पडणार असल्याचे डंख म्हणाले. यंदा महाराष्ट्रात ८ जूनला मोसमी पावसाला सुरुवात होणार असून, यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मान्सूनच्या आगमनामुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानात घसरणीला सुरुवात झाली असून, आगामी पाच दिवसांत ४ ते ५ अंशांनी तापमान कमी होईल. तसेच देशातील बहुतांश राज्यांत वळवाचा पाऊस सुरू झाला आहे. यंदाचा उन्हाळा देशातील सर्वाधिक उष्णतेचा असून, महाराष्ट्रात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा येत आहेत. मात्र, यापासून येत्या काही दिवसांतच सुटका होणार आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने वाऱ्यांची चक्रीय स्थिती झाल्याने जम्मू-काश्मीरसह हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. तसेच उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानात येत्या ५ दिवसांत ४ ते ५ अंशांनी घट होणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page