४ सुवर्ण, १ रौप्य, ३ कांस्य पदके, कौस्तुभ बनेला दुहेरी पदक.
जनशक्तीचा दबाव न्यूज | केर्ले | सप्टेंबर ११, २०२३.
शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या ९व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कोंडगाव येथील कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यानी मोठे यश संपादन केले आहे. ह्या स्पर्धेत ४ सुवर्ण १ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह एकूण ८ पदके विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत.
शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे ९वी राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा केर्ले येथे पार पडली. ह्या स्पर्धेत कबनूरकर स्कूलच्या ६ विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. ह्या स्पर्धेत कुमेती आणि काता ह्या प्रकारात भाग घेत विद्यार्थ्यानी ८ पदके मिळवली. कुमेती ह्या प्रकारात सर्व विद्यार्थ्यांनी पदके मिळवली. कौस्तुभ बने, आधिश कबनुरकर आणि कार्तिकी झोरे सुवर्ण पदके, पायल मावेनुर हिला रौप्य तर पार्थ घोगरे, श्रावणी गांगण यांनी कांस्य पदके मिळवली. काता ह्या प्रकारात कौस्तुभ बने आणि पार्थ घोगरे यांनी सुवर्ण पदके मिळवली आहेत.
ह्या सर्व स्पर्धकांना शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश पिसाळ तसेच ट्रेनर तेजस साळुंखे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी स्पर्धकांचे संस्था चेअरमन श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लिना कबनूरकर तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.