संगमेश्वर/दिनेश आंब्रे – भारतीय प्रजसत्ताक दिनानिम्मित नावडी ग्रामपंचायतीत माननीय सरपंच सौ.प्रज्ञा कोळवणकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपसरपंच विवेक शेरे,ग्रामसेवक संजय शेलार,सदस्य योगिनी डोंगरे ,सदस्य मानसी आंब्रे तंटामुक्त अध्यक्ष संतोष सुर्वे पत्रकार दिनेश आंब्रे अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका महिला बचतगट अध्यक्षा ,विशेष कार्यकारी अधिकारी ,पोलीस पाटील अंगराज कोळवणकर,ग्रामपंचायत सदस्य अभिजित चोचे,विविध स्तरातील बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांचे शाब्दिक स्वागत ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उर्फ दादा शेट्ये यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी देशासाठी प्राणार्पण केलेले शहीद सैनिक ,स्वतंत्र्य सैनिक ,पोलीस सीमेवर्ती देशसेवा बजावत असलेले जवान,माजी सैनिक,भारतीय संघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी लिहिलेले संविधान याबद्दल आदरयुक्त विचार व्यक्त केले.
या नंतर संगमेश्वर मधील विकासात्मक बाबीवर नागरिकांनी समिती बरोबर चर्चा केले.यामध्ये शासकीय आवश्यक ती कार्यालये संगमेश्वर येथे व्हावे या करिता प्रयत्न करण्याचे सुचवण्यात आले.यावेळे बाजारपेठेतील उदय गारमेंट चे मालक महिंद्रसिंग राठोड यांनी ग्रामपंचायत तीन सफाई कामगारांना ब्लेंकेट वाटप केले.सरपंच प्रज्ञा कोळवणकर व उपसरपंच विवेक शेरे,ग्रामसेवक संजय शेलार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने महेंद्रसिंग राठोड यांचे आभार मानण्यात आले.