पहिल्या टप्प्यात सात टक्के मतदानाची घसरण देशभरात 62.37% मतदान तर महाराष्ट्रात केवळ 57.82% मतदान…

Spread the love

उष्णतेची मोठी लाट असूनही काल शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरात 62.37% मतदान झाले तर महाराष्ट्रात पाच मतदारसंघांमध्ये 57.82% मतदानाची नोंद झाली आहे पश्चिम बंगाल आणि मणिपूर मध्ये काही ठिकाण वगळता 19 राज्य व दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडले. लोकसभेसह सिक्कीम आणि अरुणाचल राज्यांच्या विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत च्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये 80.17% तर पश्चिम बंगालमध्ये 77.57% मणिपूरमध्ये 69.13% आणि बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजे 48.50% मतदान झाले.

देशभरातील मतदान शांततेत पार पडत असताना कुचबिहार जिल्ह्यातील शितकुचीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आणि मतदारांना धमकावण्याचा तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे. मणिपूर मध्ये धामपोकपी येथील मतदान केंद्राजवळ काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. इरोसिंबा मतदान केंद्रावरही हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे.

हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता देशभरातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे परंतु सन 2019 च्या तुलनेत या वेळेला मतदान कमी झाल्याने त्याचा फटका कोणाला बसतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे परंतु त्यासाठी सात जून पर्यंत थांबणे भाग आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page