सिंधुदुर्गातील युवतीला पर्यटकांकडून पळवून नेण्याचा प्रयत्न! तरुणीची छेडछाड व विनयभंग, पर्यटक म्हणून आलेल्या ६ जणांनी केले भलतेच धंदे, आरोपींमध्ये म्हणे ४ पोलीस…

Spread the love

देवगड (प्रतिनिधी) – पर्यटक म्हणून आलेल्या ६ तरुणांकडून स्थानिक युवतीची छेडछडा काढत विनयभंग करुन दिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी परजिल्ह्यातील ६ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयीत ६ तरुणांमध्ये ४जण पोलीस असल्याचे म्हटले जात आहे. पर्यटक म्हणून आलेल्या तरुणांच्या भलत्याच धंद्यांनी अवघे देवगड शहर हादरले आहे. देवगडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशीरा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये हरिराम मारुती गिते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) यांच्यासह सहा संशयितांचा समावेश आहे. देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपींच्यावतीने ऍड. श्यामसुंदर जोशी यांनी काम पाहिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड येथे इनोव्हा कार घेऊन पर्यटनासाठी आलेले संशयित हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), सटवा केशव केंद्रे (३२, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), श्याम बालाजी गिते (३५, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), शंकर संभाजी गिते (३३, रा. ॐ शिववाटीका, हाऊसिंग सोसायटी, बदलापूर (पू), जि. ठाणे), प्रवीण विलास रानडे (३४, मधुबन सिटी, वसई (पू)) हे मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास एसटी स्टॅण्डमार्गे देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते. याचमार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती. या रस्त्यावरील आनंदवाडी येथे जाणार्‍या मार्गावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली.

कारमधील संशयित हरिनाम गिते याने पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून ‘माझ्यासोबत येतेस का? तुला वसई फिरवतो’, असे विचारले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणार्‍या पांढर्‍या रंगाच्या इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते, प्रवीण रानडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली. ‘तिला गाडीत घे, नंतर काय ते बघू’ असे बोलून पीडित युवतीला गाडीमधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याची व गंभीर इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी चल येतेस काय? असे विचारल्याने घाबरलेल्या युवतीने आरडा ओरडा केला. हे ऐकताच अनेकजण घटनास्थळी धावून आले. युवतीने सांगितलेली हकीगत ऐकताच जमावाने सार्‍यांना धरुन बेदम चोपले. त्यानंतर त्यांची वरात पोलीस स्टेशनला नेली. याबाबतची फिर्याद पीडित युवतीने देवगड पोलीस स्थानकात दिली असून संशयित हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गिते, शंकर संभाजी गिते, प्रवीण विलास रानडे या संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७५ (२), १४० (१), १४० (३), १४० (४), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना देवगड पोलिसांनी बुधवारी दुपारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत.गजबजलेल्या देवगडमध्ये अगदी सायंकाळी घडलेल्या या घटनेने देवगड शहरासह सारा परिसर हादरला आहे. राज्यभर मुलींबाबत वेगवेगळ्या घटना घटत असताच असे प्रकरणी पुढे आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

तरुणांनी चल येतेस काय? असे विचारल्याने घाबरलेल्या युवतीने आरडा ओरडा केला. हे ऐकताच अनेकजण घटनास्थळी धावून आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page