*सावंतवाडी:-* गोव्याहुन मुबंईला गोव बनावटीच्या चोरट्या दारूची वहातुक होणार असल्याची पक्कि खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मीळाल्याने अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रादेवी रोड आरोसबाग तिठ्यावर सापळा रचून वहानानची तपासणी सुरू केली. एम.एच.-47-एन.-1424 ही पांढर्या रंगाची हुंडाई कंपनीची कार आली असता कारची झडती घेतल्यावर कारच्या मागच्या सीटवर गोवाबनावटीची वेगवेगळ्या कंपनीची चोरटी दारू सापडुन आली.सदर चोरट्या वहातुकीवर कारवाई करून 2 लाख 16 हजार 960 रूपयांचे मद्य 4 लाख रूपये किमंतीची कार मीळुन 6 लाख 16 हजार 960 रूपयाच्या मुद्देमालासह संग्राम विक्रम सिंघ वय 31 राहाणार मालाड मुंबई या संशयीतावर कारवाई करून ताब्यात घेतले.सदरची कारवाई प्रभारी निरिक्षक प्रदिप रास्कर,सहा. दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे,जवान रणजीत शिंदे,चालक दिपक वायदंडे यांनी केली. अधीक तपास प्रदिप रास्कर करत आहेत.