
ठाणे ; निलेश घाग श्रीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०२/२०२४ भादविक ३९४,३४ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, घटक ५ कडुन सुरू असताना गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे नेमणुकीतील पो हवा / ४५२९ सुनिल निकम व पो. ना/७२५९ तेजस ठाणेकर यांना गुप्त बातमीनुसार सदर गुन्हयात वापरलेली दुचाकी वाहनावर दोन संशयीत इसम इंदिरानगर नाका भागात फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमीच्या आधारे त्याठिकाणी सापळा रचुन सदरची गाडी व दोन इराणी इसम १) आसिफ शब्बीर सैय्यद वय ६२ रा. पाटीलनगर गल्ली नं. ४, आंबीवली ता. कल्याण जि. ठाणे २) बागर आसिफ सैय्यद वय ३८ रा. भास्कर शाळेचे बाजुला कुरम चाळ आंबीवली ता. कल्याण जि. ठाणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल चौकशी व कौशल्यपुर्ण तपास करून त्यांचेकडुन ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळीसह मोटार सायकल चोरीचे दाखल असलेले १४ गुन्हे उघकीस आणुन, १४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व २ मोटार सायकल असा एकुण ५,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन पुढील तपास गुन्हे शाखा घटक ५ वागळे इस्टेट कडुन करण्यात येत आहे.वरील नमुद अटक आरोपी यांचेकडुन उघडकीस आले.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री शिवराज पाटील, मा. सहा पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) श्री. निलेश सोनावणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास घोडके, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, अविनाश महाजन, पोउपनि तुषार माने, पोउपनिरी/सुनिल अहिरे, पोहवा / सुनिल निकग, पोहवा/विजय काटकर, पोहवा/रोहीदास रावते, पोहवा/जगदीश न्हावळदे, पोहवा / सुशांत पालांडे, पोहवा / विजय साबळे, मपोहवा/मिनाक्षी मोहीते, पोहवा / माधव वाघचौरे, पोहवा/सुनील रावते, पोना / तेजस ठाणेकर, पोना / रघुनाथ गार्डे, पोना/उत्तम शेळके, पोशि/ यश यादव या पथकाने केली आहे.
जाहिरात

