बोरीवली ; महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा चौथा वर्धापन दिन बोरीवली येथे फुलपाखरू उद्यान मागाठाणे येथे रविवारी सायंकाळी साजरा झाला. या वर्धापन दिनानिमित्तम मीरा रोड पोलिस निरीक्षक श्री. रवींद्र परब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
ध्येय आणि उद्दिष्टे…..
मुंबई तसेच पुणे शहरात महाराष्ट्र वाचवा कृती समिती संलग्न मी मराठी एकिकरण समितीच्या सहकार्याने “माझा उमेदवार मराठी हवा” या सारखे अनेक उपक्रम घेण्यात आले. यावेळी संस्थेचा मूळ पाया श्री. प्रमोद मसुरकर तसेच मराठी भाषेसाठी न्याय हक्कासाठी झटणारे शिलेदार स्थापनेपासून असणारे सदस्य तसेच नवनिर्वाचीत पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र संरक्षण संघटनाच्या माध्यमातून गेल्या ९ वर्षाहून अधिक महाराष्ट्रातील हजारो मराठी व्यवसायिक मराठी पाट्या तसेच भविष्यात मराठी तरुणांना नेतृत्व करण्याचे काम सामाजिक बिगर राजकीय चळवळ याचे मार्गदर्शन लाभत आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी भाषा संचालक श्री.परशुराम पाटील हे आवर्जुन उपस्थित होते आणि त्यांनी मराठी शिलेदारांना प्रोत्साहन दिले.
यावेळी अध्यक्ष श्री धर्मेंद्र चंद्रकांत घाग,श्री.अमर कदम,आणि श्री.रविंद्र कुवेसकर,महिला उपाध्यक्ष श्रीमती.प्रगतीताई भोसले,दिप्ती वालावलकर ह्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. प्रमुख उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले. श्री.दिलीप घाग,सौ.दृष्टी घाग यानी उपस्थित राहून संघटनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला, संघटनेचे पदाधिकारी श्री रविंद्र कुवेसकर यांनी संघटनेचा सुरवातीपासूनचा सुरु झालेला झालेला प्रवास आणि संघटनेची वाटचाल संदर्भात माहिती दिली, संघटनेचा अहवाल श्री.संदेश जाधव ह्यांनी सदर केला, संघटनेच्या माध्यमातून मुख्य पदावर नवनियुक्ती म्हणून श्री.रवींद्र शिंदे, श्री.राजेश मुलुख व श्रीकांत शिंदे,उदय जागुष्टे, अजय कोयंडे,अनिल हातेकर तसेच पदाधिकारी उपस्थीत होते.
महाराष्ट्रतील मराठी भाषिकांनच्या न्याय हक्कासाठी “महाराष्ट्र संरक्षण संघटनेची” ची स्थापना करण्यात आली यातून भविष्यात मराठी माणसाला योग्य दिशा मिळू शकते. असे मत श्री. प्रमोद मसुरकर यांनी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
जाहिरात