रो रो सेवेतुन कोंकण रेल्वेला ३३ कोटींचे उत्पन्न..

Spread the love

मुंबई – कोणत्याही मार्गावर मालवाहतूक रेल्वे सेवा आर्थिक कणा समजला जातो. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेची मालवाहतुकीची सेवा रेल्वेसाठी उपयुक्तच ठरली आहे. वर्षभरात कोकण रेल्वेला ‘रो-रो’ सेवेतून ३२ कोटी ९८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

एकूण १४ हजार २१ मालवाहतूक ट्रकच्या ३४४ फेर्यांमधून रेल्वे प्रशासनाला भरघोस कमाई झाली आहे. प्रदूषणमुक्त अन् सुरक्षित सेवेमुळे ‘रो-रो’ सेवेला सर्वाधिक पसंती मिळत आहे. ‘रोल ऑन रोल ऑफ सेवा’ हा मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगळा मार्ग तयार करण्यात कोकण रेल्वे कमालीची यशस्वी ठरली आहे. कोकण रेल्वेने २६ जानेवारी १९९९ रोजी ‘रो-रो’ सेवेला प्रारंभ केल्यानंतर सुरुवातीच्या काळात मालवाहतुकीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र गेल्या २५ वर्षांत सरासरी ८ लाख ट्रक ‘रो- रो’ सेवेच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या ‘रो-रो’ सेवेच्या माध्यमातून कोकण रेल्वेला गेल्या ३ वर्षांत दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.’रो रो’ सेवा सद्यःस्थितीत कोलाड ते वेर्णा, कोलाड ते सुरतकल व वेर्णा ते सुरतकल या मार्गावर धावत आहे. भविष्यात सेवेचा आणखी विस्तार करण्याच्या विचाराधीन आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page