६५ फूट उंच लाकडी स्टेज कोसळलं, ७ भाविकांचा मृत्यू, ५० हून अधिक लोक जखमी…

Spread the love

लाकडी स्टेज कोसळलं त्यामुळे बागपतमधील अपघातात ५० हून अधिक लोक जखमी झालेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर होती, ५०० लोकांची गर्दी जमली होती.

बागपत : बागपतमधील जैन समाजाच्या निर्वाण महोत्सवादरम्यान ६५ फूट लाकडी स्टेज कोसळलं, त्याच्या पायऱ्या तुटल्यानं चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भाविक एकमेकांवर पडून किमान ७ भाविकांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जण जखमी झाले.

मंगळवारी बरौत शहरातील गांधी रोडवरील श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या मैदानात भगवान आदिनाथांचा निर्वाण लाडू महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवादरम्यान सुमारे ५०० लोकांची गर्दी होती. भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी सुमारे ६५ फूट उंचीचे स्टेज बांधण्यात आले होते. त्यावर देवाची मूर्ती ठेवली होती. कार्यक्रमादरम्यान भाविक देवाला प्रसाद देण्यासाठी पायऱ्यांवरून जात होते. यावेळी गर्दीमुळे स्टेजवरील लाकडी पायऱ्या तुटल्यानं अनेक भाविक कोसळले. अनेकजण वेदनेनं तडफडू लागले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात सुमारे ६-७ पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम अस्मिता लाल आणि एसपी अर्पित विजयवर्गीय यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बागपतचे एसपी अर्पित विजयवर्गीय यांनी अपघाताची माहिती देताना सांगितलं, “बरौत पोलीस स्टेशन परिसरात धार्मिक कार्यक्रम सुरू होता. जैन समुदायाचा मंदिरात लाडू देण्याचा कार्यक्रम होता. काही लोक लाकडी स्टेजवर चढत होते. यावेळी दुर्घटना घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार डॉक्टर, रुग्णवाहिका तसंच इतर सर्वच विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. यामध्ये काही जण गंभीर जखमी असल्यानं मृतांचा आकडा वाढू शकतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page