ठाणे- विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १६५ आदर्श शिक्षक व ११ संस्ठाचालकांचा वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आज सन्मान करण्यात आला. ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण होते. तर स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे जबाबदारी होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दूरदर्शी व लोकहिताचा विचार करणारे राजकीय व्यक्तिमत्व शिक्षकांनीच घडविले आहे.
आगामी काळात जात बाजूला ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची बीजे रुजवावीत, असे आवाहन मंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती कै. वसंतराव डावखरे स्मृत्यर्थ देण्यात येणारा शिक्षक पुरस्कार हा कोकणात बेंचमार्क झाला आहे, अशा शब्दांत श्री. चव्हाण यांनी पुरस्काराचे कौतुक केले. तर पुढील वर्षापासून शैक्षणिक वर्तुळातील मागणीनुसार, संस्थाचालक, शिक्षकांप्रमाणेच गुणवंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा निरंजन डावखरे यांच्याकडून करण्यात आली.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, माजी आमदार अजित गोगटे, जनरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उल्हास कोल्हटकर, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, भरत चव्हाण, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. प्रशम कोल्हे, सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन. एम. भामरे, कोकण पदवीधर प्रकोष्टचे संयोजक सचिन बी. मोरे, रमेश आंब्रे, राजेश मढवी, समीरा भारती, स्नेहा पाटील, किशोर पाटील, संजय महाजन, शेखर कुलकर्णी, संगिता विसपुते, नितीन खर्चे, एस. एस. पाटील यांची उपस्थिती होती.
या वेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करून मॉडर्न पेंटथलॉन क्रीडा प्रकारात सहा सुवर्ण व एक कांस्य अशी सात पदके पटकावणाऱ्या जलतरणपटू मयंक वैभव चाफेकर याचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी कोकण विभाग संयोजक किशोर पाटील, सहसंयोजक विनोद शेलकर, जिल्हा संयोजक संभाजी शेळके, सुभाष सरोदे, रमेश शर्मा, मुकेश पष्टे, राजकुमार देसाई, सुशीलकुमार दुबे, संकुल पाठक, चंद्रकांत खुताडे, हिरामण कोकाटे, किसन पाटील, आनंद शेलार, प्रसन्ना देसाई यांनी मेहनत घेतली.