भोपाळ- कोणीतरी केमिकलयुक्त गुलाल उधळल्याने आग लागल्याचे मानले जात आहे. कोणीतरी केमिकलयुक्त गुलाल उधळल्याने आग लागल्याचे मानले जात आहे.
उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात सोमवारी पहाटे 5.49 वाजता भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात आग लागली. यामध्ये पुजाऱ्यासह 14 जण भाजले. जखमींपैकी 9 जणांना इंदूरला रेफर करण्यात आले आहे. उज्जैन जिल्हा रुग्णालयातून 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, 2 दाखल आहेत.
अपघात झाला त्यावेळी मंदिरात हजारो भाविक महाकालसोबत होळी साजरी करत होते. मागून आरती करत असलेल्या पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल उधळल्याचे जखमी सेवकाने सांगितले. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात काही रसायन असल्याने आग लागल्याचा अंदाज आहे.
गर्भगृहातील चांदीच्या आवरणाला रंगापासून वाचवण्यासाठी फ्लॅक्स लावली जात असे. यामुळेही आग लागली. काही लोकांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणली. असाच प्रकार सहा वर्षांपूर्वी महाकाल मंदिरात होळीच्या दिवशी घडला होता. तेव्हा एक पुजारी भाजला होता.
जखमींना उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 9 जणांना इंदूरला रेफर करण्यात आले…
जखमींची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव भोपाळहून इंदूरला रवाना झाले आहेत. ते उज्जैनलाही जाणार आहेत…
जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश, तीन दिवसांत मागवला अहवाल
उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले की, या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री यादव यांच्याशी चर्चा केली..
या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले, ‘मुख्यमंत्री डॉ. यादव यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा महाकालकडे प्रार्थना करतो.
मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरच्या अरबिंदो रुग्णालयात जखमींची भेट घेतली…
हे झाले जखमी-
संजीव पुजारी
सत्यनारायण सोनी
चिंतामण
रमेश
अंश शर्मा
शुभम
विकास
महेश शर्मा
मनोज शर्मा
आनंद
सोनू राठौर
राजकुमार बैस
कमल
मंगल
20 ते 25% भाजलेल्या 9 जणांना इंदूरला रेफर करण्यात आले..
जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन पीएन वर्मा यांनी सांगितले की, 14 जखमींपैकी 9 जणांना इंदूरला रेफर करण्यात आले आहे. 3 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 जण दाखल आहेत. इंदूरला रेफर केलेले लोक 20 ते 25% भाजले होते. त्वचा जळल्याने खूप तडफडत होते, त्यामुळे सगळेच घाबरले होते. कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
उद्यापासून रोजच्या आरतीच्या वेळा बदलणार आहेत..
आज धूलिवंदन साजरे होत आहे. पहाटे 4 वाजताच्या भस्म आरतीमध्ये प्रथम महाकालाला रंग व गुलाल उधळण्यात आला. 26 मार्चपासून दैनंदिन महाकाल आरतीच्या वेळेतही बदल होणार आहे.