10 वी, 12 वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले:राज्यभरात पावसाचा कहर असल्याने शासनाचा निर्णय; ‘या’ दिवशी होईल परीक्षा…

Spread the love

मुंबई- राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. पुणे, मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असून अनेक भागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. उद्या होणारी दहावी आणि बारावीची पुरवणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. दहावीचा पुढे ढकलण्यात आलेला पेपर 31 जुलै रोजी तर बारावीचे पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

मुंबई, पुण्यात आज शाळांना सुट्टी…

मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 26 जुलै रोजी होणारा दहावी बोर्डाचा पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आलेले आहे.

कधी होणार पेपर?…

26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान नियोजित होता. मात्र आता हा पेपर 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान होईल. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटन व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर-2 हे तीन पेपर होते. हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीन पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

लोकल व वाहतूक सेवेवर परिणाम..

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्याही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि वाहतूक सेवावर त्याचा परिणाम झाला आहे. म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवायच्या का नाहीत ते त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ठरवण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page