ओडिशा अपघातातील मृतांचा आकडा २३३ वर, मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर !!!….

Spread the love

ओडिसा- ओडिशा रेल्वे अपघातातील (Odisha Train Accident) मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाखांची मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील किरकोळ जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोरनजीक शुक्रवार (२ जून) रोजी संध्याकाळी ७ वाजून २० मिनीटांनी तीन गाड्यांचा अपघात झाला. यात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ९०० जण जखमी झाले आहेत. कोरमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर त्याच्या डब्यांची शेजारच्या रूळांवरून धावणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला धडक बसली. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा अधिक वाढला.

दरम्यान ओडिशातील रेल्वे अपघाताबद्दल, (Odisha Train Accident) पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भातील ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी, ओडिशातील अपघातग्रस्तांच्या शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यासोबतच राष्ट्रपती मुर्मू आणि उपराष्ट्रपती धनखड यांनी देखील घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या भीषण अपघातामुळे ओडिशामध्ये (Odisha Train Accident) एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यात आज कोणत्याही प्रकारचा राज्य उत्सव साजरा वा कार्यक्रम होणार नसल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page