ठाणे; निलेश घाग दिवा चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० या वेळेत वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यासंदर्भात दिवा मनसेकडून वाहतुक पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला होता.
दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यानुसार सोमवार दिनांक ११ डिसेंबर पासून दिवा चौकात सायंकाळी ७.०० ते रात्री.९.०० या वेळेत वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली ह्यावेळी मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटिल, प्रशांत गावडे,शैलेंद्र कदम उपस्थीत होते.
मोटार वाहन कायद्यातील सुधारणेनुसार नव्या शिक्षा कोणत्या?
- चारचाकी गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नसल्यास आधी केवळ 100 रूपये दंड आकारला जात होता. आता हा दंड 1000 रूपये करण्यात आलाय.
- दुचाकी चालवताना हेल्मेट घातला नसल्यास आधी केवळ 100 रूपये दंड आकारला जात होता. आता 1000 रूपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत वाहन परवाना रद्द करण्यता येईल.
- अॅम्ब्युलन्ससारख्या आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षाही ठोठावल्या जातील. याआधी या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा नव्हती.
- वाहन चालवताना परवाना नसेल तर 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 3 महिन्यांचा तुरूंवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा एक वर्षांची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील.
- परवाना रद्द झाला असतानाही वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
- भरधाव गाडी चालवल्यास 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
- अल्पवयीन व्यक्तीनं गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवलं जाईल आणि 25 हजार रूपये दंडासोबत 3 वर्षांचा तुरूंवास होईल. शिवाय, गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल. तसेच, अल्पवयीन आरोपी 25 वर्षांचा होईपर्यंत त्याला वाहन परवाना दिला जाणार नाही.
- मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 6 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 15 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
- वाहन चालवताना सिग्नल तोडल्यास 10 हजार ते 5 हजार रूपये दंड किंवा 6-12 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
- मोठमोठ्यानं हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा एक हजार रूपयांचा दंड आणि पुन्हा हाच गुन्हा केल्यास 2 हजार रूपयांचा दंड आकारला जाईल. याआधी यासाठी शिक्षेची कोणतीही तरतूद नव्हती.
- वाहनाला विमा संरक्षण नसल्यास दोन हजार रूपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास चार हजार रूपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
- वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास, चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेकिंग केल्यास किंवा रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालवल्यास एक हजार ते पाच हजार रूपये दंड किंवा 6-12 महिने तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये दंड किंवा दोन वर्षांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
जाहिरात