🟣लिंबूपाणी- सकाळी उठल्याबरोबर आंबट ढेकर येत असल्यास एका ग्लास पाण्यात लिंबू टाकून प्या.

Spread the love

▪️ लिंबू-पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने लवकर आराम मिळतो. दही- दुपारी आंबट ढेकर येत असेल तर गोड दही घ्या. यामुळे पोट थंड होईल आणि आंबट ढेकर येण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.भूकेमुळे पोटात गॅस तयार होतो.

▪️सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. घरी राहिल्यामुळे फारशी हालचाल होत नाही. पोट साफ न होणं, अपचन होणं, ढेकर येणं अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.ढेकर येणं ही खूपच सामन्य गोष्ट आहे. जेवण झाल्यानंतर काही वेळाने सगळ्यांनाच ढेकर येतात. पण काहीही कारण नसताना कडवट, आंबट द्रवपदार्थ घशातून आल्यास खूप त्रास होतो. त्यामुळे घसा, पोट आणि छातीत जळजळ होते. आज आम्ही तुम्हाला कडवट ढेकर येण्याची कारणं आणि त्यावरचे उपाय सांगणार आहोत.

▪️शारीरिक हालचालींमुळेही अनेकदा ढेकर येतात. निष्कारण ढेकर आल्यामुळे पोटात हवा जमा होते. सामान्य ढेकर येत असतील तर पचनक्रिया व्यवस्थित असते. रक्तप्रवाह वाढल्यामुळे़ त्याला वेग प्राप्त होतो. त्यामुळे पचनशक्ती खराब होते. अशा स्थितीत पोटात हवा जमा झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसंच पोटात जास्त प्रमाणात गॅस जमा होणं यांमुळे ढेकर येतात. ढेकर येताना एसिडीक द्रवपदार्थ घश्यात आल्यास आंबट येणं असं म्हणतात
भूकेमुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला भूक लागते. काहीतरी हलकं फुलकं खाण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जास्त हेवी खाल्लेत पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एकत्र जास्त खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खात राहा. तीव्रतेने भूक लागल्यानंतर तुम्ही काही खाता तेव्हा ५ ते १० मिनिटांनंतर लगेच ढेकर येतो. म्हणून ढेकर आल्यानंतर ३० मिनिटं ब्रेक घेतल्यानंतर काहीही खायला हवं.
सतत ढेकर येत असल्यास वेलची घालून चहा प्यायल्यास समस्येपासून आराम मिळतो.

▪️पोटासंबंधित समस्यांसाठी बडीशेप लाभदायक आहे. याने गॅसची समस्या दूर होते. बडीशेपचे रस आणि गुलाबजल समप्रमाणात मिळवून प्यायल्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते.

▪️कोंथिबीरीची दांडी चावून खाल्यास ठेकर येणं थांबतं.

▪️सोडा प्यायल्याने पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत मिळेल

▪️लवंग किंवा आल्याचा तुकडा चोखल्याने ढेकर येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

▪️थंड दूध प्यायल्यानेही ढेकर येणं थांबते.

▪️शक्यतो जेवणाच्या वेळा चुकवू नका, रात्री उशीरा जेवणं टाळा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page