कोकण रेल्वेच्या सीएसआर निधीतून जिल्हा परिषद शाळांना सायकल, हायजीन किट, संगणक आणि प्रिंटरचे वाटप-आमदार शेखर निकम यांच्या हस्ते वितरण…

Spread the love

चिपळूण दि २८ जून- शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळावी यासाठी कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडने (भारत सरकार उपक्रम) आपल्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत चिपळूण तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांना मोलाची मदत केली आहे.

या उपक्रमाअंतर्गत आगवे व मांडकी येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थिनींना सायकल व हायजीन किटचे वाटप करण्यात आले, तर खरवते व मांडकी शाळांना संगणक सेट व प्रिंटर देण्यात आले. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.

या प्रसंगी आमदार शेखर निकम म्हणाले, शिक्षण हे प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. त्या शिक्षणात तंत्रज्ञानाची भर घालून आपण ग्रामीण विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक बनवू शकतो. कोकण रेल्वेच्या या उपक्रमामुळे शाळांमध्ये सकारात्मक बदल घडतील.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक  श्री. बापट, वरिष्ठ क्षेत्रीय कार्मिक अधिकारी महेश सारवळकर, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, मुख्य कार्मिक निरीक्षक रणजीत केसरे, क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार, आयटी विभागातील महेश रेवंडकर, चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम व  मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page