पिंपरी चिंचवड शहरात भर दिवसा गोळीबार; तरुणाचा मृत्यू

Spread the love

पुणे :पिंपरी चिंचवड शहरात वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सांगवी परिसरामध्ये भरदिवसा अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार केल्याची घटना घडली असून, यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी चार वा. सुमारास सांगवी परिसरात घडली आहे. सागर शिंदे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तो गुन्हेगारी पार्श्व-भूमीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सागर शिंदे याची गोळी मारून हत्या केल्या मागे पूर्व वैमान्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पैशाच्या देवाण घेवाण वरून वाद: सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि आरोपी एकाच कारमधून सांगवी परिसरातील औंध- रावेत बी.आर.टी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ आले. गाडी मध्येच सागर आणि आरोपी योगेश जगताप यांच्यात पैशाच्या देवाण घेवाण वरून वाद सुरू झाले. एकाच गाडीतून येताना वाद विकोपाला गेला,आणि आरोपी योगेश जगतापने सागरवर पहिली गोळी झाडली. सागर गाडी बाहेर निघून पळू लागला, मात्र तेवढ्यात योजेश जगतापने सागरच्या पाठीत दुसरी गोळी झाडली. त्यात सागरचा मृत्यू झाला. भारत इलेक्ट्रिक कंपनी समोर हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर आरोपी योगेश जगताप आपल्या सहकाऱ्यासोबत गाडीतून खाली उतरले. त्यांनी चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवत अडवून त्याची दुचाकी घेऊन पळ काढला

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page