भाजपच्या संंगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्षपदी युवानेते रूपेश कदम यांची नियुक्ती

Spread the love

पक्षसंघटना वाढीवर भर देणार- रूपेश कदम

देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील युवानेते रूपेश राजेंद्र कदम यांची भाजपच्या संंगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

रूपेश कदम हे हाँटेल व्यावसायिक आहेत. त्यांच्या मातोश्री रश्मी कदम यांच्याकडून त्यांना राजकिय वारसा मिळाला आहे. रश्मी कदम या तब्बल ४० वर्षे राजकारणात सक्रिय असून रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्या तीनवेळा जि. प. सदस्या, जि. प. अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्या राहिल्या आहेत. तर आता त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांचे पुत्र रूपेश कदम हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजकारणात वाटचाल करीत आहेत. रूपेश कदम हे २०१४ पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. ते शांत, संयमी व तितकेच आक्रमक युवानेते म्हणून ओळखले जातात.

त्यांनी २०१६ ते २०२० मध्ये भाजप युवा मोर्चाच्या संंगमेश्वर तालुकाध्यक्षपदाची अतिशय चांगल्याप्रकारे जबाबदारी पार पाडली आहे. २०२० ते २०२३ मध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तमरित्या जबाबदारी पेलली आहे. त्यांनी पक्षाकडून मिळालेली जबाबदारी ही संधी समजून पक्षबांधणीवर भर दिला. प्रदेश पातळीवरून येणारे प्रत्येक कार्यक्रम यशस्वीपणे मंडळामध्ये पार पाडले. देवरूख-मार्लेश्वर रस्त्यासाठी तब्बल ३०० पेक्षा अधिक जनतेचा सहभाग करून घेऊन आमरण उपोषण यशस्वीरित्या पार पाडले. या आंदोलनाने त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते.

तसेच त्यांनी शिवप्रताप प्रतिष्ठान स्थापन करून हिंदुत्व विचारसरणीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करीत आहेत. ओझरे जि. प. गट शिवसेना प्रबळ असताना आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार असताना त्यांनी ३ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकावला. मुरादपूरमधील विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये पूर्णपणे भाजपचे चेअरमन बसवले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा दलित वस्तीवर दौरा आयोजित करून त्यांनी तो यशस्वीपणे पार पाडला. त्यांनी आजवर पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. पक्षासाठी ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर संंगमेश्वर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

रूपेश कदम हे भाजपचे आक्रमक युवानेते नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर जनतेच्या समस्या उचलून धरत अनेक सामाजिक आंदोलने यशस्वी केली आहेत. जनतेचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत ही त्यांची धारणा असते. त्यांचा विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. सर्वधार्मियांशी असलेले सौहादपूर्ण संबंध हा त्यांचा विशेष स्वभावगुण आहे. त्यांचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी राजकारणविरहीत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर भाजप पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे अतिशय स्नेहपूर्ण संबंध आहेत. तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रूपेश कदम यांनी म्हटले कि, संपुर्ण तालुका फिरून पक्षसंघटना वाढीवर आपला भर राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवणार आहे. तसेच पक्षात तरूणांचा भरणा कसा होईल यावर लक्ष देणार आहे. यापुढे पक्षात तरूणांचा प्रवेश करून घेणार आहे. आपल्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाडू असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी मंडळमध्ये सर्व ठिकाणी शक्ती केंद्रप्रमुख नेमण्यावर आपण लक्ष देणार असून १+३० बुथप्रमुख नेमणार आहे. प्रत्येक बुथ प्रमुखांना सक्षम बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page