तुम्ही शिवसेना हे नाव चोरले मात्र शिवसेना चोरू शकणार नाही,धनुष्यबाण चोरु शकता मात्र ते तुम्हाला पेलवणार नाही- उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली

Spread the love

खेड : तुम्ही शिवसेना हे नाव चोरले मात्र शिवसेना चोरू शकणार नाही. धनुष्यबाण चोरु शकता मात्र ते तुम्हाला पेलवणार नाही. ढेकणं चिरडायला एक बोट काफी आहे.ज्यांना कुटंब मानलं त्यांनी आईवरच वार केला. शिवसेना ही आपली आई आहे, शिवसेना नसती तर हे कोण असते. शिवसेना नाव बाजूला ठेवून तुमच्या आई वडिलांचे नाव लावून पक्ष बांधणी करुन दाखवा, अशा शब्‍दात ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
निवडणुक आयोगाचे म्हणणे आम्हाला मान्य नाही. आयोग चिन्ह देऊ शकतं, पण पक्ष नाही. आम्ही ते देऊ देणार नाही. जो धनुष्यबाण घेऊन समोर येईल तो चोर आहे, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले. भाजपच्या मागे बाळासाहेब उभे नसते तर भाजपचे काय झाले असते, असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रातील उद्योगांकडे बघायची कोणाची हिंमत होत नव्हती. सध्या महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या हिरावून नेल्या जात आहे. सगळे उद्योधंदे गुजरातला नेले जात आहेत, महाराष्ट्राला काही द्यायचे नाही. उद्योग बाहेर पाठवायचे आणि फुटक्या एसटीवर प्रगत महाराष्ट्र असे फोटो लावायचे, असा टोलाही त्‍यांनी यावेळी लगावला.
तुमचा सगळा वेळ फिरण्यात, दिल्लीला मुजरा करण्यात जात आहे, अख्खं महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे. गुवाहाटीला फिरुन महाराष्ट्र फिरू शकत नाही, अशी बोचरी टीकाही त्‍यांनी यावेळी केली.
कोकणातील आणि रत्नागिरीतील माणसांनी शिवसेनेवर प्रेम केले आहे.या भूमीतील माणसं देवमाणसं आहेत.म्हणून मी तुमच्याकडे साथ मागायला आलो आहे अशी साद कोकणवासियांना उद्धव ठाकरे यांनी खेडमधील सभेत घातली सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडताना आपल्या पक्षाचे चिन्ह गोठवले, पक्ष पळवला अशी टीका करत तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्या वडिलांचे नाव काढून तुमच्या आई वडिलांचे नाव लावून निवडणूक लढवून दाखवा असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर टीका करताना त्यांनी बंडखोरी वेळची आठवण करून दिली आहे. आपण मुख्यमंत्री असताना राज्यात उद्योग व्यवसाय येत होते.तर दुसरीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चालू असतानाही मी मुख्यमंत्री असताना कानडी मुख्यमंत्र्यांची हिम्मत नव्हती तर आता साधं डोळे वठारले तरी आमचे मुख्यमंत्री शेपूट घालतात असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर जहरी टीका करताना एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आहे. हे सांगताना निवडणूक आयोगावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना म्हणाले की, तुमच्या डोळ्याला जर मोतीबिंदू झाला नसाल तर खेडमधील गोळीबार मैदानावर येऊन बघा खरी शिवसेना कुणाची आहे असा जोरदार हल्लाबोल केला आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटावर जो अन्याय करायचा आहे त्या पद्धतीने त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे.ठाकरे गटाचे चिन्ह बदललं तरीही आम्ही अंधेरीमध्ये गड राखला आहे.

यांच्यातील अनेक जण असे आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना कधी पाहिलंही नाही ते माणसं आता आम्हाला शिवसेना समजून सांगू लागली आहेत असा टोलाही त्यांनी भाजपमधील नेत्यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी खेडच्या गोळीबार मैदानावर प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page