नवी दिल्ली: चेन्नईच्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची अफाट गर्दी होत आहे. धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याचे संकेत मिळाल्यामुळेच चाहत्यांनी प्रत्येक सामन्याला स्टेडिअमवर गर्दी करत आहेत. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी धोनीचे यंदाची अखेरची स्पर्धा असल्याची चर्चा होतेय. एमएस धोनीने यावर आपल्या खास शैलीत उत्तर देत 2024 मध्येही खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
इकाना स्टेडिअमवर चेन्नई आणि लखनौ यांच्यात सामना रंगला आहे. नाणेफेकीनंतर Danny Morrison यांनी धोनीला निवृत्तीबाबत विचारणा केली. तेव्हा धोनीने त्यांना आपल्याच शैलीत उत्तर देत शांत केले.
नामेफेकीनंतर धोनीला Danny Morrison याने विचारले की, आयपीएलचा अखेरचा हंगाम एन्जॉय करतोय का? यावेळी धोनीने हसत आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ही माझी अखेरची आयपीएल स्पर्धा असेल.. हे तुम्ही ठरवलेय.. मी नाही.. यावर Danny Morrison याने धोनी पुढच्यावर्षीही कमबॅक करेल असे म्हटले. त्यावर धोनीने हसत हसत मैदान सोडले.